गाव कसे प्रवृत्त झाले

गाव कसे प्रवृत्त झाले त्याबद्दलची माहीती

दूर्गापूर हे गाव प्रवरा नदीच्या काठावर असल्याने येथील परीसर हा बागायती शेतीचा आहे।त्यामुळे लोकांची आर्थीक परिस्थीती चांगली आहे।तसेच गावातील अनेक उत्सव हे सार्वजनीकरित्या होत असल्याने गावात एकोपा व सहकार्याची भावना आहे त्यामुळे संपूर्ण स्वच्छता अभियानात लोक सहभाग महत्वाचा असल्याने यात लोकांची मदत झाली।गावात ग्रामसभा शिवारफेरी शाळेतील मुलांमाफ‍र्त स्वच्छतेचे संदेश फेरी गृहभेटी महिला बचतगट यांना मार्गदर्शन करण्यात आले।लोकांना आरोग्याचे महत्व पटवून दिल्याने गाव स्वच्छतेतून समृदधीकडे गेले। त्यातूनच गावाचा विकास होऊन गावात परिवर्तन झाले।

पूर्वीची स्थीती व माहीती 
गावात एकुण 426 कुटूंब व फक्त 110 कुटूंबाकडे शौचालय होते व त्यातील अनेक अनुदानाचे व बाकीचे सर्व लोक उघडयावर शौचास जात असत।त्यामुळे गावातील रस्ते तेच दुर्गंधीयुक्त असल्याने गावाकडे बघण्याचा दृष्टीकोनही तसाच होता।तसेच रस्त्याच्या कडेला मोकळया जागेत उकीरडे असल्यामुळे गावात पूर्ण अस्वच्छता व घाण दिसत।त्यामुळे गावात अनेक प्रकारचे रोग उदभवत होते।